हिवताप प्रतिरोध महीना हिवतापाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन!

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक मो.9921400542असदपूर
दिनाक 11 जून मोर्शी
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे वतीने जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन पाळला जातो. हिवताप हा ॲनाफिलीस डासांच्या मादिपासुन पसरणारा असल्याने काळजी घेतल्यास हिवतापापासुन मुक्तता मिळवु शकतो.या करीता उपायजोजना करणे गरजेचे असल्याने दिनांक ०१ ते ३० जून पर्यंत हिवताप प्रतिरोध महिना पाळण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालय मोर्शी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक ०१ ते ३० जून हा महिना आरोग्य विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात हिवताप प्रतिरोध महिना म्हणुन पाळण्यात येतो ॲनाफिलीस डासांच्या मादिपासून पसरणारा हा आजार आहे. हा डास घरघुती पाणी, घरघुती भांडी, टाकी, रांजण, माठ,जुनाट टायर,फुटके डब्बे, फुटलेल्या बादल्या मध्ये साचलेल्या पाण्यात डास अंडी देतो, म्हणजेच पाण्यात तयार होणारा हा डास आहे.
हिवतापावर नियंत्रण ठेवण्याकरीता खालील उपाययोजना करणे जरुरी आहे.

१) ताप आल्यास व ताप कमी होत नसल्यास रुग्णाचे अंग ओल्या कापडाने पुसून काढावे तसेच रुग्णाला ताबडतोब जवळच्या सरकारी उपकेंद्र , प्रा. आ. केंद्र , ग्रामीण रुग्णालय, किंवा खाजगी डॉक्टर कडून उपचार करुन घ्यावा.
२) आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, म्हणजेच घरगुती पाणी साठवण्याची भांडी, हौद, माठ,टँक व रांजण इत्यादी ६व्या दिवशी घासुन स्वच्छ कोरडे करावे व पुर्ण सुकल्यानंतर पाणी भरावे. पाण्याची कमतरता असल्यास पाणी जाड कापडाने गाळून घ्यावे. व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
३) घराच्या छतावर किंवा आवारात पडुन असलेल्या निकामी वस्तु जसे टायर, शिश्या, टिनडब्बे यांना नष्ट करावे किंवा विल्हेवाट लावावी.
४) प्रत्येकांनी आपआपल्या घरासमोरील नाल्या स्वच्छ ठेवाव्या.पाणी वाहते ठेवावे.
५) घराच्या परिसरात डबके किंवा गटारे तयार होऊ देवु नये. झाल्यास घरगुती उपाय म्हणुन पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडावे.
७) संडासच्या गॅस पाईपला पातळ कापड किंवा नायलॉनची पिशवी बांधावी.
८) डासापासून स्वरक्षणाकरीता मच्छरदाणीचा वापर करावा.
९) शक्य असल्यास दरवाजे व खिडक्यांना जाळ्या लावुन डासांपासून बचाव करावा.
१०) डासांपासून बचावासाठी संध्याकाळच्या वेळेस लांब लचक पुर्ण बाजु कपड्यांचा वापर करून परीधान करावे.

जनतेनी उपरोक्त उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास डासोपत्तीस आळा घालने व त्यापासून होणाऱ्या हिवपापापासून मुक्ती सहज शक्य आहे.
वरील बाबतीत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सहसंचालक अकोला डॉ. कमलेश भंडारी सर जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती
डॉ. शरद जोगी सर उपजिल्हा रुग्णालय मोर्शी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद चव्हाण यांनी केले. आरोग सहाय्यक अनिल जाधव, विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, विनोद पवार, नंदू थोरात हे हिवताप प्रतिरोध महिना कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

Leave a Comment