अवघ्या ५ तासात कारवाई, महाराष्ट्रातील पहिलीच घटना
प्रतिनिधी वर्धा/हिंगणघाट प्रमोद जुमडे
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरुन हवालातील ५कोटीरुपयेबंदुकीचा धाक दाखवून लुटणा-या टोळीतील तिघांना अवघ्या ५तासात अटक करण्यात वर्ध पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी रचलेल्या शंभर सहाय्यकाच्या चमूने साडेतीन कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. महाराष्ट्रात एवढी मोठी रक्कम वर्धा पोलिसांना हस्तगत करण्यात पहिल्यांदाच यश आल.
नागपूर हैद्राबाद महामार्ग क्र- ७वरुन हवालाचे ५ कोटी रुपये बंदूकीचा धाक दाखवून लूटत असल्याची माहिती वर्धा पोलिस अधीक्षकांना मिळाली यावरुन त्यांनी स्वत: हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत पोहचून आरोपींना पकडण्याचा सापळा रचला. यामध्ये रक्कम घेऊन जाणारी टोळी नागपूरकडे जात असल्याचे लक्षात येताच नुरुल हसन यांनी यवतमाळ , नागपूर, ग्रामीण, शहर व वर्धा स्थानिक गुन्हे शाखा यातील प्रमुख अधिकारी,कर्मचारी यांना मार्गावर ठेवून नागपूर शहरातील अंबाझरी
परिसरात तांत्रिक परिस्थिती हाताळून ३ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेजवळून ३ कोटी २५ लाख जप्त करण्यात आले. यातील १ आरोपी फरार होण्यास यशस्वी ठरला असून त्याचेकडे माहिती मिळाल्याप्रमाणे १ कोटी ८५ लाख असल्याचे प्राथमिक माहिती असून केवळ ५ तासांच्या आत १०० पोलिसांच्या अतिरिक्त बळ वापरुन ही कारवाई करण्यात आली.
सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडलेली घटना असून यात ५ कोटींपैकी ३ कोटी २५ लाख जप्त करण्यात आले. उर्वरित १ कोटी ८५ लाखांच्या शोधार्थ पोलिस चमू कार्यरत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. पोलिस विभागासाठी महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्यामुळे आरोपी ताब्यात घेणे महत्वाचे ठरले आहे.