हतेडी बु येथे बाबासाहेबांना अभिवादन :

 

बुलढाणा : ( प्रतिनिधी )

हतेडी बु येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या 64 व्या महापरी निर्वाण दिनानिम्मीत्त त्यांना 6 डिसेंबर रोजी त्यांना विनम्र अभिवादन करण्यास आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज्ञानेश्वर जाधव यांनी पुष्पहार अर्पन केले. यावेळी प्रा.सचिन खरे ,यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग प्रत्येकाने अंगीकारावा व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालावे असे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले . शेवटी बाबासाहेबाना आभिवादन करून त्रिशरण पंचशील घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल झिने यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले . यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थीत होते .

Leave a Comment