स्वतः मध्ये “समग्र गुणात्मक बदल” घडवून शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा–डाएट प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे विषय साधनव्यक्ती यांच्या आढावा सभेत प्रतिपादन.

 

गडचिरोली:-दिनांक:-१७.५.२०२३ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर कार्यरत विषय साधनव्यक्ती यांची दिनांक १६ मे २०२३ ते १८ मे २०२३ या कालावधीत विज्ञान,गणित,सामाजिक शास्त्र,हिंन्दी मराठी व इंग्रजी विषयाच्या विषय साधनव्यक्तींची शासन स्तरावरावरील राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाच्या अनुषंगाने आढावा सभा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.

आढावा सभेचे अध्यक्ष डॉ विनित मत्ते हे होते तर प्रमुख उपस्थिती अधिव्याख्याता वैशाली ऐगोलपवार मॅडम,पुनित मातकर सर,प्रथम संस्थेचे श्री श्रीकांत पावडे,विषय सहायक प्रदीप पाटील,गुरूराज मेंढे,समुपदेशक प्रभाकर साखरे,सुनील उंदीरवाडे,आयटी विषय सहायक तपन सरकार उपस्थित होते.

आढावा सभेत गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या फुलोरा उपक्रमात विषय साधनव्यक्ती यांची भूमिका, प्रभावी आणि परिणामकारक शाळा भेटी,निपुण भारत अभियान कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी केलेले प्रयत्न,शिक्षण परिषदांमध्ये घेत

असलेले विषय,कृतीआराखडा, SLAS,NAS मध्ये केलेले कार्य,अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण,प्रारंभिक मुक्त शाळा निर्माण करण्यासाठी शाळांना केलेली मदत,शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा आणि माता पालक गटांना दिलेल्या मदतगार भेटी,व्यवसाय अभ्यासक्रम,बालभवनातील योगदान,शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न,स्टार्स प्रकल्पांतर्गत केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी केलेले

कार्य,निष्ठा ४.० आणि अविरत प्रशिक्षण,स्वतःचा प्रशिक्षणातील सहभाग,कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न,शैक्षणिक साहित्यांच्या पेटीतील साहित्य वापर व इतर महत्त्वाच्या विषयावर पिपिटी व्दारा सादरीकरण आणि आढावा घेण्यात आला.

प्रसंगी अधिव्याख्याता पुनित मातकर आणि वैशालीताई येगोलपवार यांनी सादरीकरणातील नोंदीसह विषय साधनव्यक्तींना आवश्यक सुचना केल्या तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांनी बारा ही तालुक्यातील उपस्थित विषय साधनव्यक्ती यांनी सादर केलेल्या पिपिटीचे कौतुक करून स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करण्यासाठी आणि शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांचे आभार विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी व्यक्त केले.

Leave a Comment