सुशिक्षित बेरोजगारीने बळी घेतलेल्या नर्सिंगची विद्यार्थिनी कु.जोत्स्ना कैलास तायडे च्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्या व संग्रामपूर तालुक्यात ANM नर्सिंग च्या विद्यार्थिनीचा त्वरित भरणा करावा या मागणीसाठी ,भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट च्या वतीने दिले जी.प.अधक्ष्यांना दिले निवेदन.

0
352

 

अतिबहुल आदिवासी संग्रामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या कु.जोत्स्ना कैलास तायडे हिच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळण्याबाबत व कोविड १९ काळात आरोग्य सेविका म्हणून स्वयंसेवा देणाऱ्या ANM नर्सिंग विद्यार्थिनींचा स्थानिक स्तरावर भरणा करण्याबाबत.

आम्ही सर्व ANM नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी सध्या कोविडं १९ च्या काळात जीव मुठीत ठेऊन गेली 2 महीने आरोग्य सेविका म्हणून काम करत आहोत.परंतु त्याचा मोबदला तर काही नाहीच परंतु बेरोजगरी परिस्थितीमुळे आमची उपासमार होऊन अंत्यत हलाखीच्या परिस्थतीत आम्ही जीवन जगत आहोत.या बेरोजगारी अभावीच आमच्याच एक कु जोत्स्ना कैलास तायडे या ANM सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थिनीने दि.19/09/2020 रोजी संग्रामपूर तालुक्यात आत्महत्या सुद्धा केली आहे.आणि अतिबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात आरोग्य सेवकांचा अभाव असल्यामुळे आरोग्य यंत्रणा मृत्यूशय्येवर आहे.आशा परिस्थतीत वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन/सरकार दरबारी आम्हा ANM नर्सिंग पूर्ण झालेल्या व कोविड योद्धा म्हणून आरोग्य सेविका म्हणून स्वयंसेवा देणाऱ्यांचा कोणताही विचार केला जात नाही ही शोकांतिका आहे.तरी सर्व परिस्थतीचा विचार करून आपण माय बाप सरकारने व शासनाने त्वरीत कोविड योद्धा आरोग्य सेविका म्हणून सेवा देणाऱ्या ANM नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा स्थानिक स्तरावर भरणा करावा ही विनंती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सदर भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट संघटनेच्या मागणीला व आंदोलनाला भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा,राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ,भारतीय युवा मोर्चा,भारतीय बेरोजगार मोर्चा या देशव्यापी संघटनांनी समर्थन दर्शविले आहे.यावेळी भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ च्या तालुका संयोजिका .कुआम्रपाली वाकोडे ,दीपाली बोदडे,सुषमा भीलंगे,मनीषा वानखडे,काजल भोटकर, रोशनी गव्हांदे,प्रियंका सोनोने,सपना दांडगे,दीपाली वानखडे,अस्विनी नृपणारायन, यासह बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here