सुनगाव येथील महाजल योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती

 

गजानन सोनटक्के

जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील मोठी योजना असणारी महाजल योजना पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे सदर टाकीला तीन ते चार ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे टाकी भोवताली राहणाऱ्या नागरिकांनी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत येथे तक्रार दाखल केलेली आहे सदर टाकीची गळती थांबवावी व तीन ते चार महिन्यापासून होत असलेले गळती प्रमाण वाढत आहे व ते पाणी प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने टाकीखाली खड्डा खोदलेला आहे व टाकीतून होणारे पाणी त्या खड्ड्यात मुरत आहे त्यामुळे ते पाणी टाकीच्या पायथ्याशी मुरून भविष्यात टाकी पडण्याची शक्यता आहे व गळतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे टाकी फुटण्याची शक्यता आहे अशी तक्रार ग्रामपंचायतला दिली आहे त्याच्या प्रतिलीपी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती व ठाणेदार जळगाव जामोद यांना दिल्या आहेत तरी ग्रामपंचायतीने सदर टाकीची दुरुस्ती त्वरित करावी व टाकीची होणारी पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे या तक्रारीवर हरी नारायण हागे शंकर गोविंदा नानगदे अशोक काशिराम धागे विष्णू अंबडकार यांच्या सह्या आहेत

Leave a Comment