गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सुनगाव येथील मिलिंद नगर स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनी वाहण्यात आली आदरांजली. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या समस्त घटकांना विविध अधिकार बहाल केले या देशातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या आधारित अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले प्रतिपादन अमोल तायडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला माजी उपसरपंच तुकाराम माजी नगरसेवक राजेंद्र वाघ शेगाव जाधव ज्ञानेश्वर तायडे बळीराम जाधव किसन अर्दळे,अमोल तायडे, संदेश वानखडे, लक्ष्मण अंदुरकार,दिपक इंगळे,गुणरतन दामोदर, प्रमोद इंगळे,अनिल सावळे,प्रल्हाद इंगळे,आदेश वानखडे यांच्यासह बहुसंख्य भिम अनुयायी उपस्थित होते.