सिंदखेड राजा येथे अखेर लसीकरणाचा शुभारंभ !आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड ची लस !कोविड ची लस न घाबरता घ्यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांचे आव्हान

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

बहु प्रतिक्षेत असलेल्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ अखेर सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ४ फेब्रुवारीपासून सुरू झाला ‘ज्या ठिकाणी लस ठेवलेले आहे अशा ठिकाणी सुसज्ज कक्षामध्ये सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष श्री सतीश भाऊ तायडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी इतर मान्यवर तसेच पत्रकार बंधु यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ‘यावेळी लसीकरणाची सुरुवातग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ . एस एम बिराजदार यांना कोविड ची लस देऊन लसीकरणाची सुरुवात या वेळी करण्यात आली .यानंतर सिंदखेड राजा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी सुद्धा ची लस देऊन कोविड ची लस पूर्णतः सुरक्षित आहे लोकांनी कोविड ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले ।किरकोळ हाता पायाला कणकण वाटणे अशी लक्षणे दिसून आली असल्यास ‘आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका ‘आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यासाठी .घाबरण्याचे कुठलेही कारण नाही ‘कोविड लस घेणाऱ्या मध्ये प्रामुख्याने ‘तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महिंद्र कुमार साळवे ‘तालुका आरोग्य सहाय्यक श्री ए बी तिडके ‘श्री नितीन इंगळे ‘ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा चे ‘डॉक्टर गाणार ,डॉक्टर बुधवत डॉक्टर दराडे डॉक्टर मेहेत्रे ,डॉक्टर मस्के ,डॉक्टर शामली, डॉक्टर मनीषा ,डॉक्टर पवार,श्री दिलीप म्हहेत्रे ,श्री राठोड ‘श्रीमती डोंगरदिवे श्रीमती संगीता ब्राह्मणे श्रीमती छाया सपकाळ श्रीमती गायकवाड श्री नागरे श्री मवाळ श्री मानवतकर श्रीमती वर्षा राठोड श्रीमती सीमा जाधव श्रीमती मायावती मस्के श्री श्री वसीम शेख सह इतर कर्मचाऱ्यांनी कोविड ची लस यावेळी घेतली ‘, कोविंड ची लस पूर्णतः सुरक्षित असून इतरांनी न घाबरता ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र साळवे यांनी केले आहे ‘

Leave a Comment