सावधान ,हे धोकादायक एप जर तुमच्या फोन मधे असेल तर लगेच डिलीट करा, अन्यथा, ?

 

Surya marathi news

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : या काही दिवसांपासून जगभरात नेटफ्लिक्सवरील Squid Game सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरत होती. त्यानंतर आता Squid Game नावानं अनेक फेक अ‍ॅप या मार्केटमध्ये येत आहेत. तर
त्याद्वारे लोकांचा डेटा (Squid Game app dangerous for smartphones) आणि इतर खास माहिती मोबाइल मधुन चोरली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता Google Play Store वरून या धोकादायक अ‍ॅप्सला हटवण्यात आलं आहे. युजर्सला स्मार्टफोन्स वापरताना सावधानता बाळगावी लागणार आहे.  तर हे धोकादायक अ‍ॅप फोनमध्ये कसे येतात? काही दिवसांपूर्वी गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD नावानं एक अ‍ॅप दिसत होतं. या अ‍ॅपला अनेक लोकांनी स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉलदेखील केलं होतं.

या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सना खोट्या जाहिराती आणि एसएमएस सब्सक्रिप्शन पाठवलं जात होतं. त्यात काही युजर्सला ही गडबड लक्षात येताच त्यांनी या अ‍ॅपवरून तात्काळ साइनआउट केलं. 120W सुपरफास्ट चार्जिंगसह लाँच होणार Redmi Note 11 Pro, पाहा काय असेल किंमत या App च्या धोक्याची माहिती सुरक्षा कंपनी ESET चे विशेषज्ञ लुकास स्टेफानको यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गूगलकडे तक्रार करून या (Squid Game app) ला प्ले स्टोर वरून हटवण्यास गूगलला भाग पाडलं आहे. परंतु ही अ‍ॅप गूगल प्ले स्टोर वरून डिलीट होईपर्यंत किमान 5 हजार लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केलेलं होतं.

Aadhaar Card: तुमच्या 5 वर्षाहून लहान मुलांच्या आधार कार्डसाठी असा करा अर्ज काय काळजी घ्याल? कोणतंही अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्याआधी त्या अ‍ॅपच्या मोर डिटेल्समध्ये जाऊन ती कंपनी तरी एक वेळा व्हेरिफाय आहे की नाही ते तपासुन घ्यावे त्याचबरोबर जे अ‍ॅप डाऊनलोड कराल ते याआधी किती लोकांनी डाऊनलोड केलं आहे याची खात्री करा. कुठल्याही अ‍ॅपला इन्स्टॉल करण्याआधी संबंधित App चे रिव्ह्यू वाचा. App डाऊनलोड केल्यानंतर विविध नोटिफिकेशन्स येतात, त्यामध्ये खाजगी डेटाची परवानगी असू शकते.

त्यामुळे ते नीट वाचूनच परवानगी द्यायला हवी. फेसबुक पेपर लीकमधून मोठा खुलासा,Facebookवरुन कमी होतेय तरुणांची संख्या,काय आहेत कारणं दरम्यान याच खाजगी डेटा प्रकरणावरून आता अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत. अ‍ॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टम iOS14 या अपडेटमुळे फेसबुकच्या (Apples ad blocking feature hurts Facebook) पेजेसवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार फेसबुकने केली आहे. तर फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून युजर्सचा डाटा चोरून आणि त्याद्वारे टार्गेटेड ऑडियन्स तयार करत असल्याचा आरोप अ‍ॅपने फेसबुकवर वर केला आहे .

Leave a Comment