इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील सागर विठ्ठल कोलकार वय 31 वर्ष याने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली
की 23 जूनच्या रात्री आई बाबासह रात्री घरी जेवण केल्यानंतर आम्ही सगळेजण झोपी गेलो होतो मध्यरात्री नंतर आईने मला झोपेतून उठवून तुझे बाबा दिसत नाहीत कुठे आहेत ते बघ त्यामुळे मी व माझी आई आम्ही दोघांनी बाबांचा शोध घेतला असता
मागील बाजूच्या खोलीमध्ये माझे वडील विठ्ठल शालिग्राम कौलकार हे छतावरील पंख्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन मरण पावलेले आढळून आले. अशा फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कलम 174 जा.फौ अन्वय मर्ग दाखल केला आहे
अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल धनराज माने बक्कल नंबर 629 हे करीत आहेत