साखरखेर्डा येथील ठाणेदाराचा बाणेदारपणा कायम!स्वतः गाडीत फिरून दुकाने बंद करण्याचे केले आव्हान ! जिल्ह्यात सोमवार ७ सकाळी पर्यंत सर्व दवाखाने वगळता सर्व दुकाने राहणार कडकडीत बंद !

0
467

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून ‘सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व च दुकाने शनिवार व रविवार या दोन सुट्टीच्या दिवसांमध्ये सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडकडीत बंद असणार आहे ‘दवाखाने व औषधे दुकाने24 तास सुरू राहणार असून दूध विक्रीसाठी सकाळ ते दुपारी आणि संध्याकाळी दोन तास वेळ राहील ’27 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपासून हि कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे ‘याबाबतचे शुद्धिपत्रक बुलढाणा जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी काढले आहे व एक दिवस संचारबंदी वाढवली आहे दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद असणार आहे ‘शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तसेच जिल्ह्यामध्ये संचारबंदी असल्यामुळे गर्दी होण्याचा संभाव्य धोके लक्षात घेऊन ‘हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे ‘तालुक्यातील साखरखेर्डा येथे सुद्धा दोन दिवस कोणीही घराच्या बाहेर निघू नये व सर्व दुकाने बंद करण्याचे आव्हान खुद साखरखेर्डा चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी केली आहे,त्यांनी स्वतः गाडी मध्ये फिरून लाऊड स्पीकर च्या माध्यमातून हे आवाहन केले आहे,काही ठिकाणी आपण बघतो की कोणत्याही खात्याचे प्रमुख हे मध्ये कॅबीन मध्ये बसून आदेश सोडत असतात पण खुद ठाणेदार पल्या पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहे ‘ श्री आडोळे यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा दिसून आली आहे ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here