बुलडाणा, १६ डिसेंबर जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या आदेशामुळे मोठा संभ्रम दूर झाला असून आता राज्यभरातील सर्वच ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विवेक शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी आज हा आदेश संपूर्ण राज्यभर निर्गमीत करण्यात आला आहे.