संग्रामपुर मित्र परिवाराच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन पळशीपुरा येथे करण्यात आले होते महाराष्ट्राचे दैवत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले संग्रामपूर पळशीपुरा येथे छ शिवाजी महाराज , संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन गुलपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक नारायण ठाकरे गुरुजी हे होते तर व्यासपीठावर संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंककर पुरोहित ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, शेख याकुब , डॉ अनिल वानखडे , रवि पहुरकर , शेख हमीद, राहुल शिरसोले , सह सर्व धर्मिय जेष्ठ नागरिकांची उपस्थीती होती यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या जिवन चरित्रावर जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी , संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक शंक्कर पुरोहित , शेख हमीद यांनी प्रकाश टाकुन संतांचे गुण अंगिकारण्याचे आव्हाण केले प्रास्ताविक शिक्षक हरिभाऊ तायडे यांनी संचालन वैभव गायकी यांनी केले आभार प्रदर्शन अभिषेक गावंडे यांनी मानले कार्यक्रमाला बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते