सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
सिल्लोड महाराष्ट्र महाविकास आघाडी चे राज्य सरकारने लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळातील शेतकर्याचे शेतीसाठी उपयोगी व घरगुती विज बील संपूर्ण माफ करावे अशी मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित दादा पवार आणि उर्जा मंत्री नितीन राऊत, यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून मा.ना मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे यांनी ईमेल द्वारे कळविले की, सदरील मागणी चे निवेदन पुढील कार्यवाही साठी संबधित विभागाकडे पाठवले असल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने दिनांक 23 मार्च 2020 या महिन्या पासून सतत लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करून तसेच जनता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तरी पण औरंगाबाद जिल्हात मोठया प्रमाणात नवीन रूग्ण वाढत असून ते जिल्हात 9 नऊ हजारांच्या वर कोरोना साथीचे पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुर, हात कामगार, छोटे व मध्यम वर्गीय व्यापारी वर्ग, बांधकाम मजूर , वाहन चालक व सहयोग, आदि नागरिक आर्थिक संकट ग्रस्त होऊन मध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती विज बील भरू शकत नाही तसेच शेतकरी सुध्दा शेतीचे विज बील भरू शकत नाही. त्यांना आपल्या कुटुंबासह जगणे फार कठीण होते आहेत म्हणून शासनातर्फे त्यांचे घरगुती व शेतीचे विज बील माफ करणे आवश्यक आहेत. परंतु विधूत वितरण कंपनी लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात विजेचे चार महिन्याचे एकदम मोठी रक्कम मे चे बिल देऊन वसूली करत आहेत ते तात्काळ थांबवून महाराष्ट्र राज्य सरकारने माध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती व शेतकर्याचे शेती उपयोगी विज बील तात्काळ संपूर्ण माफ करण्यात यावे असे निवेदनात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी संबंधिताना माहीत दिलेचे कळविले आहे.