सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
माणूस माणसाला ओळखत नाही अशी अवस्था सध्या निर्माण झालेली असताना ,प्रेम, भूतदया ,माया ,ममता हे शब्द दुर्मिळ झालेली असतानाकाही ठिकाणी मात्र आजही मुक्या प्राण्यांना जनावरांना त्याला पाणी पाजले जाते त्याला खाऊ घातले जाते .व अजूनही माणुसकी जिवंत आहे हे पांगरी काटे येथील युवकांनी दाखवून दिली आहे ‘
सिंदखेडराजा तालुक्यातील पांग्री काटे येथील युवक सत्यजित थिंगळे हा शेतामध्ये फेरफटका मारायला रस्त्याने जात असताना .एक माकड जखमी अवस्थेमध्ये रस्त्यावर बसलेले दिसले ‘ एरव्ही माणसे दिसली तर माकडे झाडावर पटकन चढतात किंवा पळून जातात ।परंतु जवळ गेल्यानंतर ही माकड जागचे हलले नाही तेव्हा सत्यजित थिगळे याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीतून पाणी आणून त्या माकडाला पाजले व जीवनदान दिले ‘व भूतदया याचा प्रत्यय आणून दिला ।मुक्या प्राण्यांना जीवनदान देणारे युवक अजूनही आहेत हेच सत्यजित यांनी दाखवून दिली आहे सत्यजित याने माकडाला जिवनदान दिल्या ने त्याचे कौतुक होत आहे ‘