सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी ‘शिक्षक पर्व’ उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते सन 2022- 23 साठी दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत शिक्षक पर्व उपक्रम घेण्याविषयी सुचित करण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समिती हिंगणघाट येथील शिक्षकांसाठी दिनांक:- 11/10/ 2022 ला कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन ज्ञानदा हायस्कूल सातेफळ येथे करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने व निपुण भारत उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यप्रेरणा शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे ज्येष्ठ अधीव्याख्याता डॉ. नीतू ताई गावंडे ,मंजुषाताई ओंढेकर अधिव्याख्याता मधुमती सांगळे, गटशिक्षणाधकारी अरविंद राठोड, विस्तार अधिकारी सुभाष टाकळे, शाळेचे मुख्याध्यापक निकित गेडाम, शाळेचे मुख्याधिकारी लकी खीलोसिया व सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या कार्य प्रेरणा शिबिरात 21 व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन- अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून विकसित करण्याच्या दृष्टीने ज्ञानरचनावाद, सहअध्यायी अध्ययन, ABL,सहकार्यात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेषित अध्यापन शास्त्र, स्वयं अध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धती, कला आधारित अध्यापन शास्त्र, ERAC अध्यापन पद्धतीची माहिती देण्यात आली. या शिबिरात ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नीतूताई गावंडे यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमान पद्धती व मंजुषाताई ओंढेकर यांनी जिक्सो परिमाण पद्धती यावर आधारित पाठाचे सादरीकरण केले. पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणारे उपक्रमशील शिक्षक मंगेश डफ, राहुल खोडे, नरेंद्र नन्नावरे, सीमा दाते, राजश्री दांडेकर यांनी शाळेत राबवलेल्या उपक्रमाचे सादरीकरण करून अधिव्याख्याता मधुमतीताई सांगळे यांनी घेतलेल्या गटचर्चेच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अरविंद राठोड यांनी तर संचालन विषयसाधनव्यक्ती कु. कविता घोडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समग्र शिक्षा अभियान कर्मचारी यांनी केले