सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
शिंदी ते साखरखेर्डा हा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे सुद्धा पडलेली आहे परंतु खड्डे बुजवण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे परंतु हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे काम सुरू केली आहे कारण हे काम करत असताना खड्डे बुजवताना डांबराचे प्रमाण अतिशय कमी असून घाईगडबडीने हे खड्डे बुजवण्याचे काम उरकले आहे !
त्यामुळे साखरखेर्डा ते शिंदी गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील बुजवलेल्या खड्ड्यातून गिट्टी बाहेर आली आहे ‘डांबर चे प्रमाण कमी असल्यामुळे संपूर्ण रस्ता परत जसाच्या तसा होत आहे ‘त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट अशीच अवस्था खड्डे बुजवताना झालेली दिसते .खड्डे बुजवताना निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे !