सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
अतिशय महत्त्वाच्या अशा महामार्गाला जोडणाऱ्या व दळणवळण क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता म्हणजेच शिंदी – साखरखेर्डा ते मेरा खुर्द हा रस्ता होय !या रस्त्याची मागणी अनेक वेळा वाहनधारकांनी प्रवाशांनी नागरिकांनी केली आहे !परंतु आज अजूनही या रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही ! शिंदी ते मेरा खुर्द साखरखेर्डा या रस्त्यावर तीन तीन ते चार फूट खोल खड्डे पडले असून अनेकदा रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना हे खड्डे न दिसल्यामुळे अपघात झाले आहे !हा रस्ता चिखली – बुलढाणा – औरंगबाद . जालना – पुणे -या मुख्य शहराकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो !अनेक खेडेगावातील तरुण कामगार कडे जाण्यासाठी साखरखेर्डा येथून मेरा खुर्द फाट्यावर येत असतात .परंतु हा शिंदी – मेरा खुर्द – साखरखेर्डा -ग्रामीण भागातील रस्तापूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहे तरी हा रस्ता त्वरित करण्यात यावा व पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत ।