सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावांमध्ये शहीद भगतसिंग ‘ सुखदेव ‘ राजगुरू ‘यांच्या शहीद निमित्त आदर्श गाव शिंदी येथे दिनांक 23 मार्च रोजी सकाळी ८वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन .डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया शिंदी च्या वतीने करण्यात आले होते ’23 मार्च रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना क्रांतीकारकांना इंग्रजांनी फासावर लटकवले होते ‘आणि त्यांचा स्मृतिदिन हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो ‘आणि याच शहीद दिनाचे औचित्य साधून ‘शिंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर , रक्तगट तपासणी, शिबिर नेत्रदान शिबीर,अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ‘या रक्तदान शिबिर मध्ये २५ तरुणांनी रक्तदान केले ‘रक्तदान केलेल्या तरुणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले ‘यावेळी शिंदी गावचे सरपंच विनोद खरात . पोलीस पाटील मदन हाडे ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे शिंदी अध्यक्ष निलेश बंगाळे ‘पत्रकार सचिन खंडारे ‘अरविंद खंडारे ‘अमोल खरात ‘प्रवीण वैद्य ‘डॉक्टर रामेश्वर खरात ‘सोमेश पागोरे ‘कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘दिपक खरात ‘आधी हजर होते ‘यावेळी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले ‘