सुनील पवार नांदुरा
राज्यातील शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी सरकारने वीजबिलात सवलत देण्यास जाहीर केले होते पण आता याच सरकारच्या ऊर्जामंत्री यांनीच स्वतः वीजबिल बाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकाना ती बिले भरावी लागतील असे स्पष्ट सांगितले दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी व जनतेला आलेली भरमसाठ विजबिलामध्ये रास्त सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे नांदुरा महावितरण कार्यालया समोर वीजबिल होळी आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी नांदुरा शहरासह तालुक्यातील भाजपा विजय पाटील, प्रवीण मानकर,शैलेश भाऊ मिरगे,मयुर बघे,अर्चना ताई पाटील,संतोष मुंढे सर्व पदाधिकारी व कार्यकते बहुसंख्यने उपस्थित होते