वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती गेली खरडून शेतीला आले नदीचे स्वरूप

 

पिंपळखुटा परिसरातील चित्र : शेतकरी आर्थिक संकटात

योगेश नागोलकार
प्रतिनिधी राहेर पातूर

राहेर: पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात गुरुवार दि. २३ जून रोजीच्या दुपारी अचानक आलेल्या विजेच्या गडगडासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली, गावातील अनेकांची टीन पत्रे उडाली, विद्युत खांब वाकले, तसेच विद्युत तारा लोंबकळले, आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा पावसाळा सुरुवात होताच शेतकऱ्यांनी बँक व सावकाराकडून कर्ज घेऊन नुकतेच विविध पिकांची पेरणी केली आहे. आधीच सतत नापिकीमुळे चार ते पाच वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षाची कर्जाची परतफेड होईल या आशेने शेतकऱ्यांनी यंदाही सावकार व बँकेकडून कर्ज घेऊन विविध पिकांची पेरणी केली होती. परंतु गुरुवार रोजीच्या दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, यात पिंपळखुटा येथील सुभाषराव गोविंदराव देशमुख, नाजुकराव गोविंदराव देशमुख, प्रभाताई वामनराव देशमुख, अशोकराव आनंदराव देशमुख, श्रीकृष्ण बुंदे, सह आदी शेतकऱ्यांची शेती खरडून गेल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शासनाने दखल घेऊन पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

चौ
शेतकऱ्यावर चौफेर संकट
आधीच गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती खरडून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

प्रतिक्रिया
बॅंकेकडून दीड लाख रुपये कर्ज घेऊन यंदा सात एकरामध्ये सोयाबीन व कपाशी पिकांची पेरणी केली आहे. परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती खरडून गेली आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी
-नाजुकराव गोविंदराव देशमुख शेतकरी पिंपळखुटा

Leave a Comment