अपघातामध्ये अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अक्षरश: या मार्गाची चाळणी झाली असून याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. या विरोधात आज ७ ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच महामार्गावरील अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या महामार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. मलकापूर-नांदुरा जाणाNया या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या महामार्गावर नेहमी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरात मिळाली असून रस्ता कामाला सुरूवात सुध्दा झाली होती. मात्र, चार वर्षापासून या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. नागपूर ते मुंबई हा मोठा महामार्ग असून या महामार्गावर शेकडो वाहन ये-जा करतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांनी आता मोठे रूप धारण केले आहे. अचानक वाहन खड्ड्यातून गेल्यास वाहन अनियंत्रित होवून अपघात होत आहे. विशेष करून दुचाकी चालकांसाठी ते अतिशय धोकादायक ठरले आहे. याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यामध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तर या अपघातांना तसेच रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाNया संबंधित अधिकारी, ठेकेदार यांचेवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून महामार्गाचे काम तात्काळ सुरू न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित पुंâदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, बळीराम बावस्कार, युवा प्रमुख अमोल बावस्कार, मयुर बुडुकले, अर्जुन पाटील, शितल जांगडे यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.