रामाळा तलावातील मासे मृत्युने तलावाचे प्रदुषण अधोरेखीत

 

तलावात येणारे सांडपाणी थांबवुन तलाव प्रदुषणमुक्त करण्यास खोलीकरणास सुरूवात न केल्यास इको-प्रो चा आंदोलनाचा इशारा

इको-प्रो ची प्रदूषण नियंत्रण मंडळ कडे तक्रार

चंद्रपूरः शहरातील एकमेव ऐतीहासीक गांेडकालीन रामाळा तलाव वाढते प्रदुषणामुळे मासे मृत असल्याची घटना समोर आली आहे.

तलावाच्या काठावर मासे मृत आढळुन आल्याने रामाळा तलावाचे प्रदुषण अधोरेखीत झालेले आहे.

आज सकाळी इको-प्रो सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असतांना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळुन आले.

इको-प्रो सदस्यांनी तलावात उतरून पाहणी केली, काठावरील कचÚयामुळे तसेच इकाॅर्नीया वनस्पतीखाली असल्याने बरेच मृत मासे दिसुन येत नव्हते, जवळुन बघताच संपुर्ण तलावात मासे तरंगताना दिसत होते.

परंतु सदर ठिकाणी मागील काही दिवसापासुन मासे मृत होत असल्याचे दिसुन येत आहे.

आज फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत झालेली आढळुन आली. यास कारण म्हणजे कायम तलावात येणारे सांडपाणी जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येत असते.

त्यामुळे तलावाचे प्रदुषण वाढ होउन जलजीव यांना धोकादायक ठरत आहे. सोबतच भुजल सुध्दा दुषीत होत आहे. सदर तलावाच्या काठावर पाण्यास सुटलेल्या दुर्गधीमुळे हवा जोरात असेल तेव्हा परिसरात हा दुर्गध पसरत असतो त्याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागतो.

 

इको-प्रो सातत्याने तलावाच्या प्रदुषणाकडे लक्ष वेधत वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मागणी लावुन धरत आहे. मागील वर्षी सुध्दा याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरण बाबत बैठका घेतल्या होत्या.

त्यात इको-प्रो तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे तलाव सुकवुन खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला वळती करणे, नाल्यावर जल शुध्दीकरण संयत्र उभारणे, तलावात वेकोलीचे वाया जाणारे पाणी पाईपलाईन टाकुन तलावात शुध्द पाणी आणणे यावर चर्चा झाली होती.

यानुसार वेकोलीचे पाणी तलावात आणण्याचे काम वेकोली कडुन करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरूवात करण्यात आली मात्र पावसाला सुरूवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरूवात होउ शकली नाही.

आणी त्यापुर्वी कोवीडमुळे सुध्दा तलावाच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही.

यंदा सुध्दा नोव्हे मध्ये जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत तलावाचे महत्व वाढते प्रदुषण, इकाॅनीर्या वनस्पतीची समस्याबाबत निवेदन देत खोलीकरणाची मागणी केली होती.

मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय कडून याबाबत कार्यवाही सुरू असताना सुद्धा यंदा तलाव खोलीकरणास अदयाप निर्णय झालेला नाही.

तलावाचे पाणी सोडणे आणी खोलीकरण करण्यास अधिक काळ लागणार असल्याने पावसाळा पुर्वी ही सर्व कामे होणे गरजेचे आहे.

तलाव खोलीकरण, संवर्धनासाठी दरवर्षी बैठका होतात मात्र निर्णय घेतेवेळेस कामासाठी पुरेसा वेळ हाती राहत नसल्याचे दिसून येते, यामुळे इको-प्रो ने आपल्या मासीक बैठकीत काही दिवसापुर्वीय वेळेची गरज लक्षात घेऊन नाइलाजास्तव ‘आंदोलनाची’ भुमीका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सोबतच ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8251

 

 

 

 

आज मासे मृत झालेल्या घटनेने तलावाचे वाढते प्रदुषण अधोरेखीत झाले आहे.

तलावाचे तसेच सभोवतालच्या परिसराचे सुध्दा पर्यावरण धोक्यात येत आहे. जलजिव सुरक्षीत नाहीत, प्रदुषणामुळे जलीय वनस्पती इकाॅर्नीया ची वाढ होत आहे, नैसर्गीक सौदर्यास खिळ बसल्याने सभोवतालचा परिसराचे महानगरपालीका तर्फे करण्यात आलेल्या सौदर्यीकरणाचे पर्यटनीय दुष्टया महत्व कमी होत आहे, गोंडकालीन ऐतिहासीक वारसा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे,

आदी बाबीचा विचार करता इको-प्रो संस्था आता रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीच्या मागणी करीता आक्रमक झालेली असुन आज परत तलावाच्या पात्रात इको-प्रो सदस्य उभे राहुन मृत मासे हातात पकडुन तसेच ‘सेव रामाळा तलाव’ चे फलक हातात घेत निदर्शने केलीत तसेच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी फोनवरून माहीती देत तक्रार सुध्दा केलेली आहे.

आज इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात इको-प्रोचे कार्यकर्ते तलावाचे निरीक्षण करतांना इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संजय सब्बनवार, अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रमोद मलीक, कपील चैधरी, अब्दुल जावेद, राजु काहीलकर अभय अमृतकर, मनीष गांवडे, सुनील पाटील, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, अमोल उटटलवार, सचीन धोतरे, पुजा गहुकर, प्रगती मार्कडवार, शंकर पोईनकर, अनिल, अरूण गोवारदिपे, प्रदत्ता सरोदे सहभागी झाले होते.

Leave a Comment