रामदेवबाबा सेवा समिती संग्रामपूर व जळगाव जामोद समिती कडून 21 मंदिर वर ध्वजा लावण्याचा संकल्प केला आहे.
रामदेवबाबा सेवा समिती संग्रामपूर व जळगाव जामोद कडून दरवर्षी रामदेवबाबा चे मंदिर जिथे जिथे आहे तिथे तिथे ध्वज लावण्याचा संकल्प केला असून हे मागील 3 वर्षी पासून सुरू आहे
,हे तिसरे वर्ष आहे, या माघ महिन्याच्या दि 29 व 30 जानेवारी सुरवात होणार आहे या वर्षी 21 मंदिरावर ध्वज लावण्यात येणार आहे दि 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वांजता ही समिती तालुक्यातून निघणार असून.
या मध्ये अमरावती (राजा पेठ) 9 वा,अमरावती(प्रभात चोक)10 वा, तिवसा दुपारी 12 वा,चांदुर रेल्वे(सिनेमा रोड) दु 2 वा, चांदुर रेल्वे(अमरावती रोड) दु 3 वा, मांडवा दु 4 वा, वडगाव बाजदे साय 5 वा, धामणगाव रेल्वे साय 6 वा, जळका पटाचे साय 7 वा, बाभूळगाव रात्री 8 वा, पुलगाव रात्री 9 वा व तिथेच त्या दिवशी चे मुक्काम राहणार असून.
दुसऱ्या दिवशी दि 30 जाणे रोजी पुन्हा ध्वज यात्रा ला सुरवात होणार असून वर्धा सकाळी 9 वा, आर्वी (कसबा मंदिर) 11 वा,आर्वी (घोडेवाला मंदिर) दु 12 वा, राजुरा बाजार दु 2 वा, राजुरा बाजार नेतल जिनिंग दु 3 वा, चांदुर बाजार साय 6 वा,शिरजगाव कसबा साय 7 वा, परतवाडा साय 8 वा, मल्हारा रात्री 8:30 वा, पांढरी खानमपूर रात्री 9 वाजता ध्वज लावून इथे या ध्वज यात्रेचे समारोप होणार.
आहे,या ध्वज यात्रेला रामदेव बाबा सेवा समिती चे 51 सदस्य जाणार असून जीथे जिथे ध्वज लागणार आहे तेथील भक्तांनी स्थानिक रामदेवबाबा यांच्या मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे