युवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

मागील ६ ते ७ महीण्यापासुन पुर्ण जगात कोरोना सारख्या महामारी ने ग्रासलेले असतांना सुद्धा प्रभाग ९ मधे गेले १५ ते २० दिवस झाले कोणतीही घनकचरा गाडी व नाल्यांची साफसफाई साठी आलेले नाही या बाबत वारंवार संपर्क करुनही मुख्याधिकारी तसेच न. प प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्परपने डोळे झाक करत आहे, सदर घनकचरा उचलण्याकरीता न.प प्रशासनाने ११ महिन्याकरिता सदर कंत्राट अंदाजे एक कोटी रुपयांचा दिला असुन यामधे जनतेचा पैसा वापरला जात आहे. सदर घनकचरा उचलण्याकडे कंत्राटदाराने पुर्णपणे दुर्लक्ष असुन या बाबींवर प्रशासकीय अधिकारी हे देखील दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक पाहता ईतका मोठा कंत्राट दिल्यानंतर सदर कंत्राटदाराने व न.प प्रशासनाने नियमितपणे संपूर्ण शहरातील कचरा व नाली साफ ठरलेल्या नियमानुसार करायला पाहीजे त्यानुसार होतांना दिसत नाही व त्यामुळे सदर परिसरातच नव्हे तर पुर्ण शहरात विवीध रोगांचा प्रादुर्भाव होत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे , त्यामुळे सदर हुन कचरा येत्या २४ तासात उचलल्या गेला नाही तर शिवसेनेच्या व युवा सेनेच्या वतीने सदर कचरा न.प च्या प्रशासकीय ईमारती मधे टाकण्यात येईल व त्यापासून होणार्या परीणामास व नुकसानी आपन स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी.
असा ईशारा युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने न.प प्रशासनाला देण्यात आला.
निवेदनावरती सदर प्रभागातील नागरीकांच्या व शिवसेना पदाधीकार्यांच्या सह्या आहेत.युवा सेनेचे शुभम पाटील, अक्षय भालतडक,चांद कुरेशी,दिपक बावसकार, मंगेश कतोरे, युवराज देशमुख, मयुर बोदडे, वैभव जाणे यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment