यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
दोन वर्षानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध धर्मीयांची सण उत्साह सुरू झाले आहे मुस्लिम बांधवांची बकरी ईद तर हिंदू बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये व शहरात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी बुधवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित शांतता समिती सदस्यांच्या सभेत केले आहे.
मुस्लिम बांधवांची बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक भागवत म्हणाले दोन वर्षाच्या कोरोना संसर्ग नंतर विविध धर्मांचे सण उत्सव सुरू करण्यात आले आहेत दोन वर्षानंतर विविध व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत अशा प्रसंगी येणाऱ्या विविध धर्मीयांच्या सणांमध्ये सर्व धर्मीयांनी शांतता ठेवण्यास सहकार्य करावे. दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून कोठे ही अशांतता असल्यास अशा परिस्थित नागरीकांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडीत तात्काळ पोलिसांची संपर्क करावा असे आवाहन ही यावेळी पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी केले, अफवा पसरवुन अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्ति विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. शांतता समिती बैठकीस जेष्ठ शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, माजी नगराध्यक्ष दिपक बेहडे भाजपा शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, माजी नगरसेवक सय्यद युनूस सय्यद युसुफ, शिवसेना शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले , शिवसेना तालुका उपप्रमुख शरद कोळी , शिवसेना शहर उपप्रमुव संतोष धोबी ,पप्पू जोशी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कदिरखान , माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, भगतसिंग पाटील ,शेख ताहेर शेख चांद, खरेदी विक्री संघा चेअरमन अमोल भिरुड प्रमोद नेमाडे , नितीन सोनार, करीम मन्यार ,हबीब मंजर, यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद कुमार गोसावी, पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले उपस्थित होते, बैठकीस उपस्थितांचे आभार सपोनि विनोदकुमार गोसावी यांनी मांनले.