यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,
येथील शहरातील खिरनीपुरा परिसरात एका घराला शॉर्टसर्कीट मुळे अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाच्या जिवनावश्क वस्तुसह सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरीकांच्या शर्तीच्या प्रयत्नानमुळे आग आटोक्यात . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील खिरनिपुरा परिसरात राहणारे शेख भिकारी शेख चाँद आणी त्यांचे वडील शेख चाँद शेख कालु यांच्या घराला दिनांक ११ मार्च रोजी रात्री ९ , ३० वाजेच्या सुमारास अचानक विद्युत वाहीनीत शॉर्टसर्किट झाल्याने घराला लागलेल्या भिषण आगीत संपुर्ण घर जळुन खाक झाले असुन , या आगीत सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . अचानक घराला लागलेल्या आगीमुळे घराच्या एका खोलीत अडकलेल्या दोन महीला व दोन लहान मुलांचा जिव वाचविण्यासाठी उपस्थित युवकांनी समय सुचकता बाळगुन आग लागलेल्या घराची भिंत पाडुन सुखरुप बाहेर काढण्यात नागरीकांना यश आले असुन, थोडयाच वेळेत भिषणरूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभागातील नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर , सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान नसीर खान आदी समाज बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली . दरम्यान रात्री जळुन खाक झालेल्या घराच्या पंचनामा करण्यासाठी यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी ,यावल शहर तलाठी ईश्वर कोळी थोड्या वेळेत घटनास्थळी दाखल होत असल्याचे वृत्त आहे .