यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील भालशिव शिवारातील एका व्यक्तिच्या शेतातुन गांजा लागवडीचे आढळुन आल्याने पोलीसांनी त्या शेतमालका विरूद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीसांच्या या कार्यवाही मुळे अवैध धंद्यावाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील भालशिव शिवारात चैत्राम गेंदा सोनवणे वय६० वर्ष यांनी आपल्या शेतात मानवी आरोग्यावर परिणाम करणारे अमली पदार्थाची आपल्या शेतात लागवड केली असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली असता आज दिनांक ९ एप्रील रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पोलीस अमलदार असलम खान , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर , सुशिल घुगे, राजेश वाढे तर सरकारी पंच म्हणुन परसाडे येथील तलाठी समीर निजाम तडवी व स्वप्निल शशीकांत तायडे यांच्या पथकाने गावाचे पोलीस पाटील सचिन हिरालाल तायडे यांच्या मदतीने शेतात जावुन पाहणी केली असता त्या ठीकाणी ४२ किलो५०० ग्राम वजनाचे ओले गांजाचे झाड किमत२ लाख५५ हजार रुपये इतकी हे शेतात लागवड केल्याचे मिळुन आले असता , पोलीसांनी पंचनामा करून सर्व झाडे तोडुन दोन गठ्ठे दोरीने बांधुन सिल केली असुन , याबाबत सहाय्यक फौजदार कैलाससिंग उमरावसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी चैत्राम गेंदा सोनवणे यांच्या विरुद्ध अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम१९८५चे कलम ८ ( ख ) २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल खान , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार असलम खान , पोलीस अमलदार संजय तायडे , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर हे करीत आहे .