http://https://youtu.be/tyvW4Igfjms
फुलंब्री तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ
आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त
जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय घेतला.
या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. मुंबई जवळील उरण बंदरावर 5 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे, जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण??
सन्माननीय पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात…..मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार???
सन्माननीय राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहचवाव्यात.
सन्माननीय मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बळीराजाने पिकविलेला कांदा भेट पाठवित आहोत. शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.
आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून सन्माननीय पंतप्रधान व सन्माननीय राज्यपाल यांना कांदा व निवेदन दिले आहोत.
Nationalist Congress Party – NCP
Supriya Sule