प्रतिनिधी-सचिन पगारे
नांदगांव नाशिक
महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हा कार्यकारीणी व नांदगाव तालूका संघ कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारीणीमध्ये सचिन बैरागी यांची जिल्हाध्यक्षपदी , किरण काळे यांची जिल्हासचिव पदी तर अरुण हिंगमीरे यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.सर्वांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी व तालुका अध्यक्ष महेंद्र पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २७ जानेवारी रोजी होणाऱ्या संघाच्या नाशिक जिल्हा पत्रकार गुणगौरव समारंभाबाबत सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नांदगाव तालुका कार्याध्यक्ष पदी निलेश दायमा यांची निवड करण्यात आली. ईश्वर जाधव यांची तालुका संघाच्या सचिवपदी निवड करण्यात आली तर सिताराम पिंगळे यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी नांदगाव तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र पगार,उपाध्यक्ष हेमराज वाघ ,जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,जिल्हासचिव किरण काळे,भरत पारख,जिल्हा संघटक अरुण हिंगमीरे, तूषार वाघ,नरहरी उंबरे आदी सदस्य उपस्थित होते.