सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील तांदुळवाडी येथे दहा दिवशीय भव्य बौद्ध धम्म श्रामणेर शिबिराला दिनांक /11 फेब्रुवारी पासून सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी रूमणा गावाजवळ सुरुवात झाली पुज्यंनिय भन्ते ज्ञानरक्षितजी (थेरो) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आणि पंचक्रोशीतील तब्बल 30/ते32उपासकानी चिवरप्रदान केले
पुज्यंनिय भंन्ते यांनी आपल्या मंगलमय वाणिने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि धम्म समजावून सांगितले व यातच मानवाचे कल्याण आहे आज देशाला गरज बौद्ध विचारांचीच आहे असे ते म्हणाले व संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने प्रेरीत झाला यावेळी धम्मपिठावर उपस्थित भिक्कु संघाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना धुपदिपाने प्रज्वलित करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात केली या वेळी उपस्थित महिलांनी पुज्य भिक्कु संघाचे फुल गुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी उपस्थित तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे मा.संस्कार प्रमुख नारायण शिंदे जयद्रंत खरात मेजर अनिल खरात छत्रपती शिवाजी महाराज अकॅडमी मधुकर शिंदे सोनोषी वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा.विठ्ठल सोनकांबळे भा.बौ.महासभा . सामाजिक कार्यकर्ते.कडुबाजी वाघमारे साहेब युवा नेते नितीन साळवे भिकाजी जाधव साहेब हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक सन्माननीय प्रकाश दादा खरात मा.पोलीस अधिकारी व गजानन काळे खरात साहेब व अन्य मान्यवर तांदुळवाडी येथील उपासक उपासिका हे उपस्थित होते