शेगाव प्रतिनिधी इस्माईल
शेगाव -वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, तसेच महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या आजी-माजी जील्हातील वंचित बहुजन आघाडी, तसेच युवा आघाडी,महिला आघाडी,तालुका व शहर च्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव चंद्रकांत पाटलावर फटकेबाजी करत शेगाव तहसिल समोर आंदोलन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील तसेच भाजप नेत्यांनी केलेले वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील. शाहू,फुले,आंबेडकर या महापुरुषांवर बेताल वक्तव्य करून सातत्याने त्यांना अपमानित करणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून चालूच आहे.
महामानवांवर गरड ओकणाऱ्या भाजप नेत्यांची चौकशी करून तसेच चंद्रकांत पाटलाची सखोल चौकशी करून त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा.
अशे सदर मागणीचे निवेदन शेगाव तहसीलदार डॉ.सागर भागवत यांना निवेदन देण्यात आले.
सुधारित नियम २०१६ कलम ३(१) व्ही.कलम ३(१) पी. ३(१) क्यु. नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे.
तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहीर फेक करून निषेध नोंदवणारे भीमसैनिक मनोज भास्कर गरबडे
धनंजय भाऊसाहेब इजगत
विजय धर्मा ओहोळ या समता सैनिक दल तथा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या रीतीने दाखल झालेली गुन्हे ३०७.३९३.२९४.५ ००. ५०१ १२० (ब ) 34 क्रिमिनल लॉ अमेंडमेंड ॲक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)/१३५ अन्वये गंभीर स्वरूपाची कलमे लावली आहेत.
ही कलमे निषेधार्थ आहेत.ही त्वरित गुन्हे मागे घेण्यात यावे. अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, शहराध्यक्ष संदेश शेगोकार, दीपक इंगळे, महिला आघाडी शेगाव तालुका अध्यक्ष सुनीता अंकुश एखारे, शहर अध्यक्ष संगीता सिद्धार्थ ससाने, शाखा अध्यक्ष कालखेड सुभाष तायडे,संदीप खंडेराव, संतोष तायडे, अर्जुन शेगोकार, दीपक विरघट,गौतम इंगळे वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते शेगाव तहसील कार्यालयावर हजर होते.