बुलढाणा विभागामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनी शिवशंकर भांड यांचा सन्मान !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील वाघाळा येथे पोस्टमास्टर पदावर कार्यरत असलेले व नुकतीच नागपूर येथे पदोन्नतीत बडती झालेले तालुक्यातील शिंदी येथील शिवशंकर भांडयांचा २६जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बुलढाणा डाकघर कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलढाणा विभागांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी श्री तायडे साहेब ए पी एस बुलढाणा ।श्री गोसावी (पोस्ट मास्टर )श्री सोनुने सर (बी एम )आय पी पी बी श्री दुबे सर व पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते ।प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या शिवशंकर भांड यांनी नेत्रदीपक काम केले आहे यावेळी शिवशंकर भांड यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल परिसरांमधून त्यांचे कौतुक होत आहे ‘ !

Leave a Comment