संग्रामपूरः- बुलढाणा जिल्ह्यातील वनविभागात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून संबंधितांवर कारवाई व्हावी व भ्रष्टाचाराला आळा बसावा ह्याकरता देऊळघाट येथे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष याकुब खान पठाण यांच्या फार्म हाऊस येथे समाजवादी जिल्हा संर्पक प्रमुख शेख सईद यांनी जिल्ह्यात होत असलेल्या वन विभागातील भ्रष्टाचार बाबत चर्चा केली. याबाबत संबधितावर कारवाई होऊन भ्रष्टाचारला आळा बसावा असे चर्चे दरम्यान सांगितले यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सुर्या मराठी न्युजचे मुख्य संपादक अनिल सिंग चव्हाण व निलेश चिपडे व आझाद हिन्द शेतकरी संघटना जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रसूल भाई ,आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य उपस्थित होते.सदर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यास भ्रष्टाचार निर्मुलन समिती व समाजवादीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.