बुलढाणा d.f.o अक्षय गजभिये यांची धडक कारवाई जळगाव जामोद वनविभाग येथील एक वनरक्षक आणखी निलंबित

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलढाणा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत ओढवली असून d.f.o अक्षय गजभिये त्यांनी पुन्हा जळगाव जामोद वनविभाग येथील एक वनरक्षक निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे मागील महिन्यात सुद्धा जळगाव जामोद येथील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले होते विशेष बाब म्हणजे आतापर्यंत जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील एकूण तीन कर्मचारी निलंबित झाले आहेत बुलढाणा d.f.o अक्षय गजभिये आपल्या कामात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असून ते कामात कुचराई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतात मागील फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला म्हणून वनपाल सलीम खान तसेच वनरक्षक गजानन सोळुंके यांना निलंबित केले होते खात्यात कार्यरत निष्क्रिय व कामचुकार कर्मचारी त्यांच्या रडारवर असून जळगाव जामोद वनपरिक्षेत्राच्या कुवरदेव बीटचे वनरक्षक कैलास सलामे यांनी गोमाल या गावातील एका आदिवासी बांधवांच्या घरातून सोलर ची बॅटरी चोरी केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन d.f.o अक्षय गजभिये यांनी वनरक्षक कैलास सलामेला निलंबित केले आहे एका महिन्याच्या आत जिल्ह्यातील चार कर्मचारी निलंबित झाल्याने संपूर्ण वनविभागात खळबळ माजली आहे.

Leave a Comment