अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे
सिरसोली तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील ग्रामपंचायत ची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे प्रशासक पदावर प्रभारी गटविकास अधिकारी भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसोली चा पदभार स्वीकारला त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता अढाऊ पंचायत समिती सभापती रफत सुलताना पंचायत समिती सदस्य मो इद्रीस प स संजय हिवराळे ग्रामसेवक गजानन मेतकर रतन दांडगे सरपंच सौ सरिता प्रशांत काईंगे उपसरपंच विजय वाघ ग्रामपंचायत सदस्य अहमद शहा सादिक पटेल राजू पाटील गावंडे विजय भारसाकडे इरफान अली पत्रकार विनोद सगणे ग्रा प कर्मचारी शंकर अनासने नागसेन भारसाकडे दीपक वानखडे जिल्हा परिषद मुख्याध्यापक सौ सुनंदा गावंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते पाच वर्षातील समस्या ग्रामस्थांनी प्रशाषकापुढे मांडून ते कशा प्रकारे मार्गी लागतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे