प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात परंतु येथे इतका काळाकुट्ट आंधळेपणा की स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता . ! प्रेमीयुगुलाने घेतले विष !

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

प्रेम या अडीच अक्षरी शब्दामुळे रथी महारथी हे प्रेमात बुडवून आंधळे झाल्याचे अनेक प्रकरण आपण बघितली आहे !असे म्हणतात की प्रेम हे आंधळे असते परंतु त्या पलीकडे जाऊनही प्रेम हे आंधळे असतेच असते परंतु त्याचबरोबर ते बहीरे ‘ मुके ही असते ।प्रेमात बुडाल्यामुळे कुणालाही वयाचा नात्याचा विचार मनात येत नाही हे सर्व नाती व विसरून प्रेमात आकंठ बुडालेले असतात !असाच काहीसा प्रकार सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी गावाजवळील एका झोपडीत घडला आहे . !पोफळ शिवणी येथील एक प्रियकर शुक्रवारी घरातून निघून गेला होता त्याला दोन मुले व एक मुलगी होती -त्याच बरोबर त्याच गावातील दोन मुलांची आई असलेली महिला ही बेपत्ता झाली होती !ही घटना 19 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली !तीन मुलांचा बाप असलेल्या पुरुष व दोन मुलांची आई असलेली महिला या दोघांचेही प्रेमाचे सुत जुळले व दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेत !जिएंगे तो साथ मे मरेंगे भी साथ मे असे म्हणत -गावच्या जवळ असलेल्या झोपडीत दोघांनीही विषप्राशन केले -ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र जास्त घेतल्यामुळे दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले !त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे या वयस्कर माणसाच्या प्रेमप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे !ना प्रेमात नात्यांचा विचार ना प्रेमात स्वतःच्या मुलाबाळांचा विचार यांनी केला !विवाहित प्रेमी युगुलानी स्वतःच्या मुलाबाळांचा हे विचार केला नाही !

Leave a Comment