प्रिया चा आदर्श इतर मुलींनी घ्यावा !अपघातात हात गमावलेल्या च तरुणांशी केले प्रियांनी लग्न !एकमेकांचा आधार घेऊन संसार फुलवणार – ….!

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

हिंदी चित्रपट घेऊन गेला होता ” विवाह ” यामध्ये शाहिद कपूर आणि एका मुलीशी लग्न ठरलेले असते आणि तीचे अपघातांमध्ये संपूर्ण शरीरा जळालेली असते !तरीही शाहिद कपूर तिच्याशी च लग्न करतो !अगदी असंच हुबेहूब चित्रण चिखली तालुक्यातील चांधई या गावांमध्ये घडली तर कुतूहल वाटू नये …..सध्या सोशल मीडियावर या वैशिष्ट्यपूर्ण विवाहाची चर्चा सुरू आहे .कारण ही तसेच आहे .चिखली तालुक्यातील चांद ही येथील विशाल दिनकर इंगळे आणि मंगरूळ नवघरे येथील प्रियंका अंकुश घेवंदे यांचे तीन महिन्यापूर्वी लग्न पक्के ठरलेले होते .एक नवीन सुखी संसाराची सुरुवात आपण करणार आहोत असे दोघांचाही मनी रुतले होते ‘विशाल हा प्रवर चालक म्हणून काम करत होता दोघ ही सुखी संसाराची स्वप्न फुलवत होते .दोन्हीकडे मंडळीसुद्धा लग्नाच्या तयारीच्या कामाला लागली होती ‘परंतु लग्नाच्या अगोदरच एका महिन्यात विशाल यांचा देऊळगाव मही जवळ भीषण अपघात झाला ‘व त्यात त्याचा डावा हात ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आली मात्र हात पूर्णता निकामी झाल्याने त्याचा डावा हात कापावा लागला ।विशाल हा वाहनचालक असल्यामुळे दोन्ही हाताने स्टेरिंग पकडावी लागत असते ‘शिवाय हातावर पोट होते तोच हात आता राहिला नसल्याने पुढे करावे तरी काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला ‘विशाल आणि प्रिया दोघेही अधून-मधून एकमेकांना सुखी स्वप्न संसाराची कशी रंगणार या वरून फोनवर . दोघे ही चर्चा करायचे ‘तब्येतीची विचारपूस करायचे ‘अशातच प्रीया ला विशालने सर्व खरे सांगून टाकले : !अशातच पर्यायाच्या घरच्या मंडळींनी थोडीफार कुजबूज करण्यास सुरुवात केली !आता विशाल एका हाताने कशी काम करणार ? कसा संसाराचा गाडी पुढे नेणार प्रश्न त्यांच्या मनामध्ये दाटू लागला ! प्रियाने तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त विशाललाच शेवटपर्यंत साथ देण्याचा मनामध्ये ठाम निर्णय घेतला ।संसार थाटील तर विशाल संगेच !असा ठाम निश्चय प्रियाने केला होता !लग्न झाल्यानंतर जर विशालचा हात तुटला असता तर तुम्ही तो स्वीकारला असता ना ?तीन हातांनीच संसार आम्ही आयुष्यभर फुलवू !असे प्रियाने घरच्यांना समजावून सांगितले !घरच्यांनाही प्रियाचे म्हणणे पटले व 27 नोव्हेंबरला मोजकेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत येथे दोघांचाही विवाह पार पडला !समाजामध्ये प्रियाने दिलेली ही चपराक म्हणावी लागेल !कारण अनेक मुली ह्या छोट्या छोट्या कारणावरून मुलांना नाकारत असतात !डोळ्यावरून कानावरून रूपावरून अपंगत्ववरून अनेक संसार हे माना पानावरून सुद्धा मोडले आहे !परंतु !परंतु निश्चितच समाजातील लोकांनी खास करून तरुण तरुणींनी यातून बोध घेणे गरजेचे आहे !विशाल व प्रियांच्या सुखी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

Leave a Comment