पोलीस प्रशासन व नगरपालिका यांची कारवाई विना मास्क दंड

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

कोरोना महामारीचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई या कारवाईदरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशन च्या अंतर्गत ह्या संयुक्त कारवाई दरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई दरम्यान दंड वसूल केला. याचे कारण की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे ह्या कारवाया अश्याच चालू राहतील त्यामुळे सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अति आवश्यकच आहे. तसेच नागरिकांनी कोठेही गर्दी करू नये असे आवाहन कारवाई दरम्यान करण्यात आले. ही कारवाई जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने केली ही कारवाई करताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनची टिम व नगरपालिकेची टिम यांनी विना मास्क नागरीकांवर हि कारवाई करण्यात आली.

Leave a Comment