हिंगणघाट मलक नईम
उपरोक्त विषयाची थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, यातील दिनांक 29/09/2022 चे 19.00 ते दिनांक 04/10/2022 चे 10.00 वाजता दरम्यान यातील फिर्यादी नामे श्रीमती सुष्मा राजेन्द्र भस्मे वय 43 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांचे मौजा आजंती शिवारातील शेतातील अर्धवट फॉर्महाउसचे परीसरात ठेवुन असलेले 01) एक डिझेल ईजीन किंमत 30,000/- रू. 02) लोखंडी दोन ग्रिल किंमत 8,000/- रू 03) सहा लोखंडी फासा किंमत 3500/- रू 04) पानेपेंचीस किंमत 500/- रू 05) एक सब्बल किंमत 500/- रू 06) एक कटर मशिन किंमत 2000/- रू 07) विहीरीवर खिराडी बसविण्याचे दोन लोखंडी एंगल किंमत 1500/- रू असा एकुण 46,000/- रू चा माल चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्टवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 1046/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी व त्यांचे पथकाने आरोपी नामे 1) अमरदिप शंकरराव हाडके वय 30 वर्ष, 2) संदीप दिलीपराव गोटे वय 38 वर्ष, 3) आकाष राजेन्द्र कांबळे वय 27 वर्ष तिन्ही रा. मौजा आजंती यांना निश्पण्ण करून त्यांचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला मुददेमाल आणी गुन्हा करण्याकरीता वापरलेले वाहन एक मालवाहु टाटा चारचाकी क्रमांक एम.एच. 34/ ए.व्हि. /1815 किंमत 2,00,000/- रूपये असा एकुण 2,46,000/- रू चा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास नापोकॉ प्रशांत वाटखेडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, आषिश गेडाम आणी उमेश बेले यांनी केली.