सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
बुलढाणा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेला मेहकर तालुक्यातील पेन टाकळी येथील प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होत असून जमीन नापीक होत आहे ‘म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिनांक 5 फेब्रुवारीपासून पेन टाकळी च्या पात्रांमध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .सदर पाणी कालव्याद्वारे न नेता पाईप लाईन मधून ११ किलोमीटर पर्यंत नेण्यात यावे .नाही कालव्याद्वारे पाणी इतरत्र येते मात्र ‘अनेक ठिकाणी कालवा उंच व शेत जमीन खाली राहत असल्यामुळे वाहणारे पाणी शेतात साचते त्यामुळे मोठे नुसकान होत आहे ‘मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी ‘दुधा ‘रायपुर ‘ पेण टाकळी ‘आधी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मध्ये बाराही महिने पाणी साचत राहते ‘त्यामुळे शेतातून उत्पन्न काढणे कठीण झाले आहे ‘त्यामुळे कालव्याचे पाणी पाईपलाईन द्वारे देण्यात यावे ‘या मागणीसाठी शेतकर्यांनी पेनटाकळी प्रकल्पावरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ‘यामध्ये ‘सतीश मस्के ,गजानन रहाटे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, दत्तात्रय बाहेकर, दीपक पागोरे, संजय बाहेकर, काशिनाथ बाहेकर ,महादू अवचार, नंदकिशोर काळे ,एकनाथ सास्ते,इतर शेतकऱ्यांचा यात समावेश आहे .प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुसकान भरपाई पोटी दहा हजार रुपये द्यावे अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे ‘आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन कसे लक्ष देते हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘