दिपक देशमुख
मेहकर
राज्यात सध्या सर्व दुर मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस पडतोय व या पावसामुळे बर्याच शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी ला सामोरे जावे लागले आहे.शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे तर कित्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून तलावामध्ये रुपांतर झाले आहे तर कित्येक ठिकाणी शेतजमीन खराळल्याचे चित्र दिसत आहे.अशातच शेतकऱ्यांना फुल नाही फुलांची पाकळी मिळावी या आशेने शेतकरी पिकविमा भरतात पण पहिलेच दुबार तिबार पेरणी मध्ये वेळ गेला आणि सततच्या पावसामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटी च्या अडचणी यात वेळ गेला आणि आता पिकविमा भरण्यासाठीची मुदत संपत आली आहे.मागच्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोयाबीन कापसाला भाव मिळण्यासोबतच पिकविण्यासाठी ही रान उठवले होते ज्याचा फायदा शेतकऱ्यांना भाववाढी सोबतचपिक विमा मिळण्याकरिता हा झाला.मागच्या वर्षीची पिकविण्याची मिळालेली मदत पाहता यावर्षी शेतकर्यांनी पिकविमा भरण्यासाठीची मानसिकता दाखविली परंतु मुदत संपत असल्याने बर्याच शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिकविमा मुदत वाढवून भेटण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली . त्यानुसार कोणताही शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहू नये सोबतच ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्या त्या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नुसार मदत देण्यात यावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, कृषी मंत्री पद रिकामे असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या कामामुळे शेतकर्यांच्या समस्या दुर्लक्षित राहू नये या करीता निवेदनाद्वारे पिक विमा मुदतवाढ आणि नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.