पिंपळगाव ग्रामपंचायत कडून योग्य वेळी कारवाई केली असती तर अमेश रवींद्र लिहितकर पुरात वाहून गेला असता का ? मौजा पिंपळगाव नाल्याला लागून ओमकार नगर १६ सर्व्हे.न.५५/१अ ले आऊट मालकाने येथून येणारी सरकारी नाली बंद केल्याबाबत तक्रार दाखल केली असता नाली बंद करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी नाली बंद करतांना ग्रामपंचायत ची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. गावातून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत ने त्यांना नाली पूर्ववत सुरू करून देणे बाबत जा.क्रं.५३/२०२१-२२ दि. २१/०१/२०२२ ला पत्र सुद्धा दिलेले आहे. परंतु लेआउट मालकाकडून सरकारी नाली पूर्ववत सुरू करण्यात आली नाही त्यामुळे पुराचे पाणी हे ले आउट धारकाकडून वळविण्यास सक्षम ठरले नाही त्याचा परिणाम लेआउट मध्ये गावातील पूर्ण पाणी जमा झाले . ग्रामपंचायत पिंपळगाव कडून याची अगोदरच दखल घेतली असती तर कदाचित आज २९ वर्षीय युवक अमेश रवींद्र लिहितकर, हा या पुरात वाहून गेला नसता !