(तुकाराम राठोड)
प्रतिनिधी:(जालना)जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.श्री.अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना स्वीकारून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल,अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री सावे यांनी दिली.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार,यात काही शंका नाही.तसेच याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे,माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे,माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर,खासदार बंडू जाधव,आ.नारायण कुचे,आ.कैलास गोरंट्याल,आ.संतोष दानवे,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.