,वरील विषयास अनुसरून मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होतेआणि त्यात यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची तीन वेळा पेरणी करावी लागली.असे वाटले उडीद,मुगाचे,पीक आम्हाला साद देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले.तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले.
शेतात एवढी कसरत करून सुद्धा रोगराई अतिदुष्टी सोयाबिनला हिरवा गच्च पाला दिसला पण उत्पन्न मात्र आले नाही . एकरी एक ते दीड किटल पेक्षा कमी उत्पन्न आले असून यात यात सोयाबिन काढणीचा सुद्धा खर्च निघाला नाही . त्या मुळे आत्ता वर्षभराचा घर खर्च ,शेतीचा आजाराचा खर्च , कसा भागावायचा व उदरनिर्वाह तरी कसा करायचा हाच प्रश्न पडला आहे . पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाल्या मुले सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची येणारी दिवाळी अंधारात जाणार आहे आमच्या मंडळाचे नजर अंदाज आनवरी 66 पैसे इतकी दाखवली आहे परंतु उत्पन्न झाले नसतानाही नजर अंदाज आणेवारी 30 पैसे च्या आत यायला पाहिजे होती पण ती खरी आणेवारी दाखवली नाही. तरी आम्हला यात शंका वाटत आहे म्हणुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यानं पुढे खूप मोठे आर्थिक संकट आहे . म्हणून हे परखेड महसूल मंडळ दुष्काळ ग्रॅस्थ घोषित करऊन दुष्काळाच्या सर्व सवलती पीक विमा तात्काळ लागू करण्यात यावा अन्यथा या सवलती लागी न झाल्यास 15 दिवसा नंतर आम्ही सर्व शेतकरी आमच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करू . याची दक्षता घ्यावी.