हिंगणघाट मलक मो नईम प्रतिनिधी
येथील साप्ताहिकाचे संपादक राजेश अमरचंद कोचर यांच्यावर नगरपालिका हिंगणघाट येथील करविभागात ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथ राऊत, संत खंडोबा वॉर्ड यांनी वाद करून हल्ला केला. यामध्ये राजेश कोचर यांना जबर दुखापत झाली.
हल्लेखोर ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत राऊत यांनी कोचर यांना साप्ताहिक पेपर मागितला. त्यावेळी त्यांनी पेपरची तारीख घेऊन माझे कार्यालयात यावे, पेपर काढून देतो असा सांगत असतानाच राऊत यांनी शिवीगाळ करुन राजेश कोचर यांना जबर मारहाण केली.
या घटनेचा हिंगणघाट तालुका पत्रकार संघाचे वतीने निषेध नोंदवून हल्लेखोरांवर कठोर कारवाही करावी असे निवेदन तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले यावेळी
हिंगणघाट तालुका पत्रकार संघ हिंगणघाट चे अध्यक्ष मंगेश वणीकर ,सचिव अनिल कडू,वरिष्ठ पत्रकार विजय राठी,सतीश वखरे,राजेंद्र राठी,दशरथ ढोकपांडे,नरेंद्र हाडके,अब्बास खान,संजय अग्रवाल, संजय माडे, राजू खांडरे,अजय मोहोड,जयचंद कोचर,अनिल अवस्थी,चेतन वाघमारे आदी पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला असुन हिंगणघाट तालुका पत्रकार संघाचे वतीने निवेदन दिले आहे.