पति – पत्नी जागिच ठार

0
463

 

 

नाशिक येथे पति पत्नी ठार झाल्याची घटना घडली नाशिक रस्त्यावर ओझरखेड कॉलनी नजीक वळणावर चार चाकी माल वाहतुक गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील पतीपत्नी जागीच ठार झाले.

याबाबत माहिती अशी की, रविवारी (दि.३०) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान सुधाकर रामराव महाले (वणी, वय ४२) व त्यांची पत्नी संगीता सुधाकर महाले (वय. ३८) हे आपल्या दुचाकीवरुन (एम एच १५ एच ए ५८९८) दिंडोरी कडून वणीकडे जात होते. यावेळी दिंडोरीच्या दिशेने चारचाकी माल वाहतुक गाडी (एम एच १५ ईजी ६४४०) भरधाव वेगात जात होते. ओझरखेड कॉलनी नजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले व त्या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतक भीषण होता की दुचाकीवरील महाले दाम्पत्य जागीच ठार झाले. महाले दाम्पत्य हे दिडोंरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथे गेले होते. परतीचा प्रवास करीत असताना अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातात चारचाकी उलटी होऊन पडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती वणी पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here