इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
आज दिनांक 30 /3 /2023 रोजी सकाळी मोठया उत्स्फूर्तपणे पार पडला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नित्य योग वर्गाचे आधारस्तंभ रमेशजी भट्टड हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला होम-हवन विधी आदरणीय कैलासचंद्रजी चौधरी यांच्या सहकार्याने पार पडला.कार्यक्रमात महाराष्ट्र पूर्व प्रांत सह-कोषाध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी सुलताने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी रामनवमी हा दिवस परमपूज्य योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांचा संन्यास दिवस असून योगपरीवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी चतुर्भुजजी मिटकरी भारत स्वाभिमान जिल्हा बुलडाणा, जिल्हा कोषाध्यक्ष निळकंठजी साबळे, किसान सेवा समिती चे जिल्हा प्रभारी पुरुषोत्तमजी पाटील, बुलढाणा जिल्हा योग समितीचे दशरथजी लोणकर ,जिल्हा युवा प्रभारी हरिदासजी सोळंके, महामंत्री बाबुरावजी रोकडे,महिला पतंजली च्या तालुकाअध्यक्षा वर्षाताई सरप ,भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई मसने ,व्यासपीठावर उपस्थितहोते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दीपक जी सरप,रवींद्रजी हेलोडे, हरीश जी चिंचोळकर, सविता ताई इंदोरे, धुमाळे काकू,इत्यादी मथुरा लॉन व भट्टडजीन योगवर्गाचेसर्व योग साधक व योग साधिका उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमाचे समापन शांती पाठाने झाले*