नदी पात्रातील वाळु चोरट्यांचा शोध घ्या.अन्यथा उपोषण. संतोष तेल्हारकर यांचा जिल्हा प्रशासनाला ईशारा.

 

संग्रामपूर : ( ता.प्र.) तालुक्यातुन जाणाऱ्या पुर्णा नदी व वाण नदीतून लाखो ब्रास चोरीला गेलेल्या वाळुचा शोध घ्या अन्यथा हद्दिचा कार्यभार सांभाळत असलेल्या महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी संतोष तेल्हारकर यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनातून केली आहे. अवैध रेती उत्खनन थांबवण्यासाठी अनेक तक्रारी निवेदन देऊनही प्रशासनाच्या अधिकारी गप्प असल्याने पर्यायाने लोकशाही मार्गाने दि.१ एप्रिल पासून नदिपात्रात उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
तालुक्यातील सर्वच नदिपात्रातुन ट्रक, ट्रकटर नी अवैध रेती उत्खनन होत असल्याने एक्शिडंट चे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे ह्या रेती वाहणाऱ्या ट्रक खाली घेउन अनेक लोकांचा मृत्यु सुध्दा झालेले आहेत. ह्याला पुर्णपने जबाबदार महसूल विभागाचे कर्मचारी असल्याचा गंभिर आरोप संतोष तेल्हारकर यांनी केला आहे. तालुक्यातील सर्वच नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून यातील हजारो ब्रास रेती उत्खनन करून चोरीला गेली आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. नदिपात्रातिल चोरीला गेलेल्या रेतीचा शोध घेऊन महसूल वसुल करा. ज्या हद्दीतून रेती उत्खनन करण्यात आली ते हद्दीचा कार्यभार सांभाळत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई करा. या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचा ईशारा संतोष तेल्हारकर यांनी निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Comment