संग्रामपूर येथे नगरपंचायत असून सध्या शहरात कित्येक वर्षापासून रहिविशी नसलेल्या व मयत मतदारांचे नावे मतदार यादीत असल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते त्याकरीता स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावे अश्या प्रकारचे निवेदन पत्रकार रामेश्वर गायकी यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे ना.तहसीलदार विजय चव्हाण यांना दिले आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की,संग्रामपूर येथील ग्रामपंचायत रद्द होवून सन २०१५मध्ये नगरपंचायत होवून पहिली निवडणूकही पार पडली.संग्रामपूर शहरात १७वार्ड असून सर्व प्रकारची शासकीय ,निमशासकीय कार्यालये,शाळि ,महाविद्यालये ,बॕंका,पतसंस्था, सहकारी संस्था व इतर कार्यालये आहेत .यामध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात असल्याने तसेच नव्याने नोंदणी करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.परंतु गेल्या १०ता १५वर्षापासून संग्रामपूर येथून अनेक अधिकारी ,कर्मचारी बदलून गेलेत तरी त्यांची व त्यांच्या कुटुबातील नावे,तसेच शहरातील अनेक मुलींचे लग्न होवून सासरी गेल्यात,अनेक मतदार मयत झालेत तरी त्यांची नावे अजुनही मतदार यादीत आहेत.ती कमी झालीच नाहीत तसेच मतदानाचे वेळी स्थलांतरीत मतदारांना आणण्यासाठी स्पेशल गाडी देवून आर्थिक व्यवहार सुद्धा होत असतात.काही मतदार येत सुद्धा नाहीत त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते तरी स्थलांतरीत झालेल्या सर्व मतदारांची व मयत मतदारांची नावे नगरपंचायत निवडणूकी पुर्वी मतदार यादीतुन वगळण्यात यावीत सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलडाणा,व उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना पाठविल्या आहेत.सदर निवेदनावर पत्रकार रामेश्वर गायकी यांची सही आहे.